बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 19 मे 2016 (16:08 IST)

बॉलीवूडचे स्टार्स जे BA ही पास नाही आहे ...

ऐश्वर्या राय
आपल्या सुंदरतेमुळे देशच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांना घायळ करणारी ऐशने 1994मध्ये मिस वर्ल्ड झाल्यानंतर आपला  अभ्यास मधातच सोडला. तिचे स्वप्न आर्किटेक्ट बनण्याचे होते.

सलमान खान
आमचे बजरंगी भाईजानने नॅशनल कॉलेज, बांद्राहून अभ्यास सुरू केला होता पण बॉलीवूडमध्ये आल्यानंतर त्याचा अभ्यास पूर्ण झाला नाही.  

दीपिका पादुकोण
आपल्या कूल लुक आणि स्टायलसाठी चित्रपट जगात जागा बनवणारी 'तमाशा गर्ल' दीपिकाने बंगळूरूच्या माउंट कारमेलमध्ये ऍडमिशन घेतले होते, पण मॉडलिंग असाइन्मेंटमध्ये बिजी असल्यामुळे तिला मध्येच अभ्यास सोडावा लागला. त्यानंतर तिने इग्‍नूहून शॉट टर्म कोर्ससाठी अप्लाय केला होता पण तो ही मध्येच सोडावा लागला.

करीना
कॉलेज टाइममध्ये तिला वकील बनायचे होते. तिनी मि‍ठीबाई कॉलेज, मुंबईमध्ये ऍडमिशनपण घेतली होती पण रिफ्यूजी चित्रपटात ब्रेक मिळाल्यामुळे ती एवढी व्यस्त झाल्यामुळे तिला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. 

सोनम कपूर
स्‍टायलसाठी चर्चेत राहणार्‍या सोनमने 12वी पर्यंत अभ्यास पूर्ण केला आहे. नुकतेच एका मुलाखतीत तिने सांगितले की तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले नसल्याचे फारच दुःख आहे आणि ती लवकरच आपली डिग्री पूर्ण करेल.  
 

अक्षय कुमार
मिस्‍टर खिलाड़ीच्या नावाने बॉलीवूडमध्ये आपली ओळख बनवणार्‍या अक्षयने मार्शल आर्ट शिकण्यासाठी आपल्या कॉलेज लाईफला बाय  बाय म्हटले होते. 

करिश्‍मा कपूर
आपल्या अभिनयामुळे करिश्‍माने 'प्रेम कैदी' चित्रपटापासून आपल्या फिल्मी सफरची सुरुवात केली होती. त्या वेळेस ती फक्त 16 वर्षांची होती. बॉलीवूडमध्ये व्यस्ततेमुळे तिला आपली स्‍कूलिंगपण अर्ध्यातच सोडावी लागली होती.