रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2016 (14:40 IST)

बॉलीवूड हिरो ने केली देश सेवेत आपले जीवन देणाऱ्या खऱ्या हिरोंना मदत

बॉलीवूड हिरो ने केली खरया आयुष्यातील देश सेवेत आपले जीवन देणाऱ्या खऱ्या हिरोंना मदत. हो आपला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा खूप उत्तम काम केले आहे. अभिनेत्या बरोबर  तो एक चांगला व्यक्ती आहे आणि समाजाचे देणे लागतो हे त्याने दाखवले आहे. उडी दहशतवादी हल्ल्यावर शहिदांना अनेक जण श्रद्धांजली वाहत आहेत तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने ५ ते १० लाखांपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. 
 
अक्षय कुमार म्हणतात की 'शहिदांच्या कुटुंबियांना मेडल देणे चांगलं आहे पण पुरेसं नाही नाही. त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप काहीतरी करण्याची गरज आहे आणि आवश्यकता ही.
 
अक्षयचं हे काम निश्चितच कौतूकास्पद आणि आदर्श घेण्यासारखे आहे. शहिदांच्या कुटुंबियांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. या अगोदर अक्षय ने शेतकरी कुटुंबाना मदत केली होती आणि आता शहीद सैनिकांना मदत केली.