गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये पोहोचली कॅटरिना

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ मध्यरात्री मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये जाताना पाहिलं गेलं आणि विविध चर्चाणा उधाण आलं. मिळालेल्या माहितीनुसार, बदलत्या तपमानाचा परिणाम कॅटरिनाच्या तब्येतीवर झालाय.. आणि याचमुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचं शूटिंग सध्या मोरोक्को, मुंबई आणि लंडन अशा वेगवेगळ्या परिसरात सुरू आहे. 
 
त्यामुळे मुंबई आणि मोरोक्कोमध्ये वातावरण गरम आहे.. तर लंडनमध्ये कडाक्याची थंडी.. अशा वातावरणात चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.. त्यामुळेच कॅटरिनाला हे वातावरण सहन होत नाहीये. त्यामुळेच, खार हॉस्पिटलच्या हेल्थ केअर सेंटरमध्ये कॅटरिनानं जवळपास 45 मिनिटे चेकअपसाठी घेतली.. त्यानंतर ती घरी परतली.