शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2016 (16:50 IST)

संजय लीलाच्या 'पद्मावती'मध्ये दीपिकाला हवा आहे मोठा स्टार

“राम लीला” आणि “बाजीराव मस्तानी” सारखे हिट चित्रपट दिल्यानंतर आणि चित्रपट बाजीराव मस्तानीसाठी नॅशनल अवॉर्ड जिंकणारे  डायरेक्टर संजय लीला भंसाली आपले पुढील चित्रपट “पद्मावती”ची शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू करणार आहे. बॉलीवूडहून येत असलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात बॉलीवूडची डॅशिंग दिवा दीपिका पादुकोण आणि हँडसम हंक रणवीर सिंह परत सोबत दिसणार आहे.  
 
चित्रपटात दीपिका ‘राणी पद्मावती’चा आणि रणवीर ‘सुल्तान अलाउद्दीन खिलजी’चा रोल करणार आहे. पण अद्याप चित्रपट मेकर्स राणी   पद्मावतीचा नवरा राजा रतन सिंहच्या भूमिकेबद्दल अजूनही निश्चित नाही आहे. त्याचे मोठे कारण असे आहे की दीपिका या भूमिकेसाठी बर्‍याच नायकांना रिजेक्ट करून चुकली आहे.  
 
दीपिका चित्रपटात आपल्या नवर्‍याच्या भूमिकेसाठी एखाद्या मोठ्या अॅक्टरला घेण्याची इच्छुक आहे. सुरुवातीत या रोलसाठी मसान चित्रपट फेम विकी कौशलचे नाव निश्चित झाले होते आणि त्याचे या भूमिकेसाठी ऑडिशनपण झाले होते. पण जसे की दीपिका या भूमिकेसाठी मोठ्या कलाकाराची इच्छा बाळगून होती तर विकी कौशल चित्रपटाचा भाग बनू शकला नाही.  
 
बॉलीवूडहून येत असलेल्या वृत्तानुसार आता फिल्म मेकर्स या भूमिकेसाठी शाहिद कपूरला दीपिकासोबत साइन करण्याचे मन बनवून चुकले आहे. शाहिद देखील हे चित्रपट साइन करण्यासाठी तयार आहे. आता वाट बघायची आहे की बॉलीवूडची ही मस्तानी सिल्वर स्क्रीनवर राजा रतन सिंहच्या रूपात शाहिद कपूरसोबत राणी पद्मावती बनण्यासाठी  तयार आहे की नाही.