सर्वाच्या नजरा चुकवून दीपिका बॉयफ्रेंडला भेटायला पॅरिसला
अनेक दिवसांपासून रणवीर आणि दीपिकाची भेट झालेली नाही. शूटिंगमधून सुटी झाल्याबरोबर तिने त्याच्यासाठी थेट पॅरिस गाठले. तेथे त्यांची भेट झाली. विन डिझेलबरोबर सुरू असलेल्या चित्रपटाचे शूटिंग संपताच दीपिका कुणालाही न विचारता थेट पॅरिसला गेली. याबाबतच्या कारणाचा शोध घेतला असता असे समजले की तेथे रणवीर सिंह एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्याला भेटण्यासाठी दीपिका थेट पॅरिसला गेली. आपल्या या प्रवासाबाबत कुणालाही सुगावा लागू नये याची दीपिकाने भरपूर काळजी घेतली होती. रणवीरनेही तिच्या सिक्युरिटीसाठी दिलेल्या स्टाफला मीडियापासून तिला वाचवण्याचे आदेश दिले होते. मीडियाच्या कोणत्याही माणसाला दीपिकाचे प्रवासादरम्यानचे फोटो मिळू देण्याची तंबी त्या स्टाफला देण्यात आली होती. मात्र, व्हायचे ते झालेच. दीपिका ‘सिटी ऑफ लव्ह’ म्हणजेच पॅरिसला पोहोचल्यावर तिच्या फॅनने तिला ओळखले. एवढेच नाही तर विमानतळावर तिचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आले. मुळात ही बातमी गोपनीय ठेवण्यामागे भारतातील तिचे आगामी प्रोजेक्ट असल्याचे बोलले जाते. ती हॉलिवूडमध्ये बिझी असल्याने येथील तिची अनेक कामे खोळंबली आहेत. अनेक जाहिरातींची शूटिंग आणि स्क्रीप्ट रीडिंगही बाकी आहे. त्यामुळे ‘प्रियकराला भेटायला वेळ आहे, पण कामाला नाही असा आरोप कुणी लावू नये म्हणून ही भेट गुप्त ठेवण्यात येणार होती. मात्र, ती सगळ्यांना कळालीच.