शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 22 जून 2016 (09:56 IST)

‘ढीशूम’मध्ये झळकणार सचिन!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ‘ढीशूम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहणार्‍या वरुण धवनने भेट घेतली. त्याने सचिनसोबतचा फोटोही शेअर केला आहे. वरुण या फोटोत रोहित धवनने दिग्दर्शित केलेल्या ‘ढीशूम’ चित्रपटातील पोशाखामध्ये दिसत आहे. वरुणने टिटरवर लिहिले आहे, जेव्हा जुनैद अन्सारीने क्रिकेटच्या देवाची सचिन तेंडुलकरची भेट घेतली. 
 
जुनैद हे त्याचे चित्रपटातील नाव आहे. वरुण धवन आणि जॉन अब्राहमच्या ‘ढीशूम’ चित्रपटात सचिनची झलक पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येते. 
 
‘ढीशूम’ 29 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यात जॉन अब्राहम, वरुण धवन, जॅकलिन ङ्खर्नाडिस, साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.