सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 6 जून 2016 (10:34 IST)

‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘सैराट’

‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘सैराट’च्या टीमला आमंत्रित केलं होतं. ‘सैराट’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमाच्या टीमने हिंदीतील सर्वात लोकप्रिय शोमध्ये आपली हजेरी लावली आहे.

 कपिलच्या या मंचावर पोहोचल्यानंतर ‘सैराट’च्या आर्ची, परशा, सल्या, लंगड्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. कपिलला आधी फक्त टीव्हीवर पाहायचो, पण आज प्रत्यक्षात भेट झाल्यानंतर जाणवणं ते फारच हसवतात. खूप मज्जा आली, असं सांगताना आर्ची अर्थात रिंकू अधिकच खुलली होती.

नागराज मंजुळे म्हणाला की, “मराठी सिनेमा अपग्रेड होतोय. शाहरुखने एका रिजनल शोमध्ये हजेरी लावली तर एक रिजनल सिनेमा नॅशलन चॅनल शोमध्ये हजेरी लावतोय, चांगलं वाटतंय.”