1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2024 (12:01 IST)

सोनाली बेंद्रेशी भेट झाली नाही म्हणून चाहत्याने केली आत्महत्या, अभिनेत्री म्हणाली-कोणी असे कसे....

आपल्या आवडत्या बॉलिवूड स्टार्ससाठी चाहत्यांची प्रचंड प्रेम पहावयास मिळते. पण अनेक वेळेस काही चाहते असे काही करतात की यामुळे स्टार्सला धक्का बसतो. दावा केला जात आहे की, सोनाली बेंद्रेच्या एका चाहत्याने त्यांच्याशी भेट झाली नाही म्हणून आपला जीव दिला आहे. 
 
आताच मिड डे सोबत इंटरव्ह्यू दरम्यान सोनाली बेंद्रेना त्यांच्या चाहत्याच्या सुसाईड बद्दल विचारण्यात आले. सोनाली यांना विचारण्यात आले की, जेव्हा त्या 1990 दरम्यान भोपाळ मध्ये आल्या होत्या तर त्यांचा चाहता त्यांना भेटू शकला नाही. यामुळे त्याने नदी मध्ये उडी घेत जीव दिला. 
 
हे ऐकून सोनाली बेंद्रे म्हणाल्या की, 'हे खर आहेका? कोणी असे कसे....' यानंतर सोनाली बेंद्रे यांना विचारण्यात आले की, त्यांनी चाहत्यांव्दारा केली गेलेली काही वेगळी वागणूक पहिली का? यावर सोनाली म्हणाल्याकी, 'चाहत्यांचे पत्र यायचे. आम्ही त्या बद्दल माहहती काढण्याचा विचार केला तरी की ही खरी हत्या आहे का? जर असे असते तर मी कोसळली असती. 
 
तसेच सोनाली म्हणाली की, सर्वात चांगले आहे की, तुम्ही कौतुक करा आणि तेवढ्याच मर्यादेत राहा. लोक लोकांना एवढा उच्चं दर्जा कसाकाय देऊ शकतात. जे आज नाही तर उद्या खाली येतीलच. 
 
सोनाली बेंद्रे यांनी आपल्या करियरची सुरवात वर्ष 1994 मध्ये चित्रपट 'आग' मधून केली होती. बॉलिवूड मध्ये येण्यापूर्वी त्यांनी अनेक जाहिराती केल्या होत्या.