सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 20 मे 2021 (13:36 IST)

मंदिराचा दमदार वर्कआऊट

Photo : Instagram
मंदिरा बेदी 49 वर्षांची झाली तरी आपल्या फिटनेसची काळजी घेते. आपल्या फिटनेस वर्कआऊटचे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. तसाच एक व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. त्यात ती जीममध्ये  वर्कआऊट करताना दिसते आहे. यामध्ये ती बॅक बेंड योगा म्हणजेच धनुरासन करताना दिसते आहे. तिच्या या लवचिक आसन करण्यावर तिच्या फॅन्सनी कॉमेंटही केल्या आहेत. एकाने माझी ऑक्सिजन लेव्हल वाढली. अशी कॉमेंट केली आहे. आणखी एकाने सुपरफिट तर दुसर्याने परफेक्ट म्हणून मंदिराचे कौतुक केले आहे.
 
 आणखी एका व्हिडिओमध्ये मंदिराने शीर्षासन केल्याचे दिसते आहे. असे शीर्षासन केल्यामुळे आपली सगळी चिंता दूर होते. मन शांत होते. एरव्ही कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपले कर्म करावे, असेही मंदिराने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
 
मंदिराच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये ‘शांति' ही सीरियल यशस्वी ठरली होती. त्यानंतर दुश्मन, क्योंकि सांस भी कभी बहू थी या सीरियल्स व्यतिरिक्त दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सारखया सिनेमामध्येही तिने काम केले आहे.