घरात हे वर्कआउट करा आणि स्वतःला निरोगी ठेवा
कोरोना साथीच्या रोगाच्या धोक्या ने प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम केला आहे. अशा परिस्थितीत बाहेर पडू नये अशी सर्वांची इच्छा असते.काही लोक तर असे आहेत जे मॉर्निंग वॉक देखील बंद करत आहे. या मुळे त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम पडत आहे. जिम उघडल्यावर देखील बरेच लोक बाहेर जाणे टाळत आहे. जर आपण देखील या साथीच्या भीती मुळे आपले वर्क आऊट करणे बंद केले आहे तर ही चूक अजिबात करू नका. आम्ही आपल्याला काही इनडोअर वर्कआउट सांगत आहोत, जे आपण घरातून बाहेर न जाता देखील करू शकता.
1 नृत्य करा -
प्रदूषणात घरातून बाहेर पडणे धोक्यापासून मुक्त नाही तर आपण इनडोअर वर्क आऊट जसे योगा आणि झुंबा सारखे कोणते ही डान्स करू शकता. झुंबाच्या व्यतिरिक्त कोणतेही नृत्य करू शकता. या मुळे आपण ताजेतवाने आणि ऊर्जावान अनुभवाल.
2 योग आणि सूर्य नमस्कार -
जर आपल्याला योगा येत नसेल, तर आपण सूर्यनमस्कारा सारखे मूलभूत योगासनापासून सुरुवात करू शकता. सूर्य नमस्काराने शरीरांचे स्नायू ताणतात आणि आपण संपूर्ण दिवस ताजेतवाने अनुभवाल. आपण इंटरनेट वर बघून देखील हे आसन करू शकता.
3 प्राणायाम करा -
या शिवाय प्राणायाम करणे देखील चांगले पर्याय आहे. या मध्ये दीर्घ श्वासोच्छ्वास करावा लागतो. ज्या मुळे आपली श्वसन प्रणाली चांगली राहते.
4 एक्रोयोगा -
आपण घराच्या आत एक्रोयोगा देखील करू शकता. हे एक्रोबेटिक्स आणि योगाचे मिश्रित रूप आहे. स्नायूंच्या सामर्थ्यासाठी आपण आपले शरीराचे वजन, पुस्तके वापरू शकता.
5 वॉल पुश अप्स -
वॉल पुशअप, स्क्वैट्स, क्रन्चेस इत्यादी असे काही व्यायाम आहेत जे 15 ते 20 मिनिटात होतात.