सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (13:35 IST)

कोरोनाच्या काळात आपली विचारसरणी सकारात्मक कशी ठेवावी

कोरोनाच्या काळात लोकांमध्ये नैराश्य, भीती आणि मनात नकारात्मकता म्हणजे नकारात्मक विचारसरणी उद्भवत आहे.अशा परिस्थितीत सकारात्मक विचारसरणी ठेवणं आवश्यक आहे, कारण सकारात्मक विचारसरणी ठेवल्यानं सर्व काही चांगलं होत आणि माणूस यश मिळवू शकतो. जर आपली विचारसरणी नकारात्मक आहे तर आपण स्वतः बरोबरच दुसऱ्यांचे देखील नुकसान करीत आहात. म्हणून स्वतःची विचारसरणी सकारात्मक ठेवा. या साठी योगाचे सोपे मार्ग आहे. योग आपल्या विचारसरणीला निरोगी ठेवत.
 
1 आपल्या विचारांचा विचार करा -
आपल्या विचारांवर आपण पुनर्विचार करावे की आपण जे विचार करीत आहात ते चूक आहे की बरोबर, नकारात्मक आहे की सकारात्मक, आपण स्वतः बद्दल आणि इतरांबद्दल किती चांगले आणि वाईट विचार करता. या पद्धतीला योगामध्ये स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे म्हणतात. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा आपण निश्चितच चांगल्या विचारसरणीला प्रोत्साहन देता. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे. आपल्या चांगल्या विचारांचा अभ्यास करणे आणि त्या अभ्यासाला अभ्यासित करणे. आपण स्वतःचे ज्ञान,कृती आणि वर्तनाचे पुनरावलोकन करीत वाचन करावे. ज्या मुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यात आपल्याला आनंद मिळतो.या साठी पुस्तकांना आपले मित्र बनवा.
 
2 सकारात्मक गोष्टींचा विचार करा - 
नकारात्मक विचार आपल्या मेंदूत स्वतःच येतात त्यांच्या बद्दल विचार करण्याची काहीच गरज नसते. पण सकारात्मक विचारांना आणण्यासाठी ताण द्यावा लागतो. जेव्हा कधी आपल्या मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा आपण त्वरितच सकारात्मक विचार मनात आणावे. आपण या प्रक्रियेची सतत पुनरावृत्ती करीत राहिल्यास एक दिवस नकारात्मक विचार येणं बंद होईल.
 
3 शौच -
ह्याला इंग्रजीमध्ये Purity असे म्हणू  शकतो. अष्टांग योगाचे दुसरे अंग 'नियम' च्या अंतर्गत पहिले शौच म्हणजे मल-विसर्जन चे जीवनात खूप महत्त्व आहे. शौच म्हणजे शुचिता,शुद्धता,पावित्र्य, शुद्धी. शौच म्हणजे शरीराची मनातली बाह्य आणि अंतर्गत शुद्धता होणे. शौच म्हणजे घाणीला बाहेर काढणे देखील आहे. शौचाचे दोन प्रकार आहे.बाह्य आणि आंतरिक. बाह्यचा अर्थ बाहेरच्या शुद्धीशी आहे आणि आंतरिक म्हणजे आतली शुद्धता करणे. म्हणजेच मन, वचन, कर्माची आंतरिक शुद्धी होणं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शरीराने,मनाने, वचनाने, कर्माने शुद्ध होते तेव्हा त्याला आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे फायदे मिळणे सुरू होतात. 
 
योग आणि आयुर्वेदाच्या पंचकर्मातूनच हे शक्य आहे किंवा शुद्धता राखल्याने देखील हे शक्य असत. बाहेरची स्वच्छता आपण स्नान करून, शरीरातील छिद्रांना व्यवस्थित धुऊन करतो. आंतरिक शुद्धता म्हणजे पोट,मन आणि मेंदूला चांगल्या प्रकारे स्वच्छ करणं आहे. योगात शुद्धीसाठी पंचकर्म आणि पंचक्लेश यांचा देखील उल्लेख आहे.

4 विश्वास - 
आपण देवांवर विश्वास ठेवा किंवा स्वतःवर विश्वास ठेवा हे आपली खूप मदत करतं. हे आपल्या विचारसरणीला सकारात्मक बनवतं.जर आपल्यामध्ये विश्वासाचे सामर्थ्य आहे तर त्यामुळे एक नव्या आशेचा जन्म होतो आणि आपली विचारसरणी सकारात्मक होऊ लागते.ह्याचा विचार करा की आयुष्यात विजय-पराभव,चढ-उतार तर निश्चितच आहे.पण मी ह्याला घाबरून जाणार नाही. मी एक योद्धा प्रमाणे पुढे जाईन. अशा प्रकारे स्वतःमध्ये एक योद्धा तयार करा.

5 प्राणायाम आणि धारणा-
आपल्या श्वासाची गतीच आपल्या विचारांना चालवते, सकारात्मक किंवा नकारात्मक बनवते. आपण लक्षात घ्या की ज्यावेळी आपण रागवत असता तेव्हा आपल्या श्वासाची गती बदलते. जेव्हा प्रेमाच्या भावना असतात त्यावेळी श्वासाची हालचाल वेगळी असते. अशा प्रमाणे आपले रक्त संचार देखील होत. म्हणून योगात असे देखील म्हटले आहे की श्वासोच्छ्वासाच्या हळू आणि शांत होण्यावर, इंद्रियांच्या विषयांमधून दूर झाल्यावर मन स्वतःच शरीराच्या एका विशिष्ट ठिकाणी स्थिर होतो, तेव्हा ऊर्जेचा प्रवाह देखील त्याच दिशेने होतो. अशाने मनाची शक्ती वाढते. मन जे विचार करतं तसे घडू लागतं. जी लोक दृढनिश्चयी असतात, अनवधानाने त्यांची धारणा देखील पुष्ट होऊ लागते.