मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (13:02 IST)

आमिरचा डिजिटल डेब्यू अडचणीत

ठग्स ऑफ हिंदोस्तान फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान डिजिटल जगतामध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आमिर नेटफ्लिक्सबरोबर मिळून ओशोंच्या आयुष्यावर आधारित एक सीरिज घेऊन येणार आहे. ही वेब सीरिज शकुन बत्रा दिग्दर्शित करत आहेत. आमिर ओशोंवर बनणार्‍या या वेब सीरिजमध्ये लीड रोल साकारणार होता. प्रत्यक्षात नेटफ्लिक्सची ही सीरिज होल्डवर गेली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आमिर खानने नेटफ्लिक्सच्या सीरिजसाठी खूप मोठ्या रकमेची मागणी केली आहे. ज्यामुळे निर्माच्यांनी हा प्रोजेक्ट होल्डवर ठेवला आहे व विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. निर्मात्यांना आमिरने मागितलेली ही रक्कम खूप मोठी वाटत आहे. त्यामुळे दोघांमध्ये फीबद्दल चर्चाही झालेली आहे, परंतु आमिर काही फी कमी करण्याच्या मूडमध्ये नाहीयं. त्यामुळे मेकर्सनी ओशो बायोपिक सीरिज होल्ड केली आहे.