बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (13:59 IST)

अभिषेक ने लिहिले अमिताभ यांना हे भावनिक पोस्ट

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरचे 50 वर्ष पूर्ण केले. या विशेष प्रसंगी त्यांच्या मुलगा, अभिषेक बच्चन याने खूप सुंदर पोस्ट लिहिले आहे. अभिषेकने इन्स्टाग्रामवर आपला एक चित्र शेअर केला आहे, ज्यात त्याने बिग बी यांचा फोटो असलेले टी-शर्ट घातले आहे. फोटो शेअर करताना अभिषेकने लिहिले, 'माझे वडील, चांगले मित्र, मार्गदर्शक, एक आदर्श, एक नायक, एक चांगले टीकाकार आणि सर्वात मोठा आधार आहे माझ्यासाठी. 50 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्यांनी आपला चित्रपट प्रवास सुरू केला होता. मला खात्री आहे की आज देखील आपल्या कामासाठी त्यांचा उत्साह आणि दृष्टिकोन अगदी पहिल्या दिवसासारखेच आहे.' 
 
अभिषेकने लिहिले, प्रिय बाबा, आज आम्ही तुम्हाला सेलिब्रेट करू, तुमची प्रतिभा, तुमच्या पॅशनला, तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वा आज साजरा करू. हे पाहण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही की पुढच्या 50 वर्षात तुम्ही तुमच्या कामात आणखी काय-काय यश मिळवाल? आज जेव्हा मी वडिलांना या विशेष प्रसंगी त्यांच्या खोलीत जाऊन विश केलं आणि विचारलं की ते कुठे जात आहेत तर त्यांनी उत्तर दिलं 'कामावर'.
 
तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी, श्वेता बच्चनने आपल्या वडिलांचे फोटो शेअर करून लिहिले 'गोल्ड'. 
 
सांगायचे म्हणजे बिग बी यांनी फेब्रुवारी 1969 मध्ये त्यांचे पहिले चित्रपट 'सात हिंदुस्तानी' साइन केली होती.