सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (13:45 IST)

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमागृहात रिलीज होणार

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'लक्ष्मी बॉम्ब'बाबत दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ वाढत आहे. जो सिनेमा आधी मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याची तयारी सुरू होती, तो आता कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. पण दिवाळीत अक्षयचा हा सिनेमा फॅन्ससाठी एक खास ट्रीटच ठरणार आहे. अशात हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक झाले आहेत.
 
आता बातमी समोर येत आहे की, अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल. सिने समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर याची माहिती दिली. तर भारतातील लोक ९ नोव्हेंबरलाच हा सिनेमा डीज्नी हॉटस्टारवर बघू शकणार आहेत. 
 
अक्षय कुमार या सिनेमातून पहिल्यांदाच एका किन्नरची भूमिका साकारणार आहे. अशात त्याचा हा एक्सपरिमेंट प्रेक्षकांना किती भावतो, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी आणि तुषार कपूरही दिसणार आहे. कोरोना काळात सोशल मीडियातून या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं. 
 
सिनेमाचं मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आलं होतं. त्या पोस्टरमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की, मेकर्सनी अक्षय कुमारच्या लूकवर फार काम केलंय. त्यामुळे त्याच्या फॅन्स हा सिनेमा बघण्यासाठी आतुर झालेले आहेत. दरम्यान, अक्षय सध्या त्याच्या आगामी 'बेल बॉटम' आणि 'पृथ्वीराज' सिनेमाचं शूटींग करत आहे.