शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (19:08 IST)

‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा

Akshay made
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने काही दिवसापुर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तरिख जाहीर केली. येत्या १९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे अक्षय आणि बेल बॉटमच्या टीमने सांगितले. यादरम्यान सोमवारी अक्षयने या चित्रपटासंदर्भात आणखी एक नवी घोषणा केली आहे. बेल बॉटम हा चित्रपट थ्रिडी मध्ये प्रदर्शित होणार आहे असे अक्षयने ट्विट करत जाहीर केले.
 
यादरम्यान हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशी चर्चा देखील सुरु होती. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे अक्षय कुमारने त्याचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. बेल बॉटम या चित्रपटाचे कथानक १९८० च्या दशकावर आधारित असून, यात अक्षय कुमार रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या कलाकारांचा समावेश आहे.