गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 30 मार्च 2018 (13:30 IST)

आलिया-कतरिनाची मैत्री तुटण्या मागे रणबीर कपूर?

बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफ यांच्या घट्ट मैची चर्चा तर इंडस्ट्री आणि माध्यमांमध्ये कायमच असते. पण आता या मैत्रीत फूट पडली असून, त्याला रणबीर कपूर कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
एका इंग्रजी मनोरंजन वेबसाइटच्या वृत्तानुसार, आलिया आणि कतरिनाच्या मैत्रीचा गोडवा आता संपला असून, त्यात कटुता आली आहे. रणबीर आणि आलिया सध्या 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगध्ये व्यस्त आहेत. आलिया शूटिंग संपवून भारतात परतली आहे. पण रणबीर अजूनही लंडनमध्येच आहे. पण 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि आलियाची जवळीक वाढल्याची चर्चा आहे. हीच बाब कतरिनाला खटकत आहे. 
कतरिनाच्या एका मित्राच्या म्हणण्यानुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगदरम्यान प्रत्येकजण रणबीर आणि आलियाच्या अफेअरबाबत चर्चा करत आहे आणि ही चर्चा दोघींच्या 'कॉमन फ्रेंड'कडून कतरिनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच कतरिना कमालीची नाराज आहे. रणबीरसोबत जवळीक वाढल्याचे स्वतः आलियाकडून कळायला हवे होते, असे कतरिनाला वाटते. यावरूनच ती नाराज आहे.