रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 जानेवारी 2019 (09:40 IST)

आलिया-वरूणचीजोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच ऑनस्क्रिन जोडीने खूपच धमल केलेली आहे. 'स्टुडंट ऑफ द इअर', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता ही ऑनस्क्रिन जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डेव्हिड धवनच्या आगामी 'कुली नंबर वन' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरुण आणि आलिया ही जोडी झळकणार आहे. रोहित धवन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटात सुरुवातीला सारा अली खान भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा होत्या. पण या चित्रपटात आता आलियाची वर्णी लागली असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी डेव्हिड धवनसोबत वरूण धवनने 'जुडवा-2 आणि 'मैं तेरा हिरो' या चित्रपटात भूकिा साकारली होती. आता 'कुली नंबर वन'च्या रिमेकमध्ये पुन्हा एकदा वरूण धवन वडिलांच्याच चित्रपटात झळकणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आलिया आणि वरूण दोघेही सध्या 'कलंक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.