सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

लहान बाह्या घालणे महागात पडले, महिला पत्रकाराला संसदेतून बाहेर काढले

कॅनबेरा- ऑस्ट्रेलियामध्ये एक महिला पत्रकार लहान बाह्यांचा ड्रेस घालून संसदेत पोहचली. तिचे खांदे दिसत असल्यामुळे तिला संसदेतून बाहेर काढण्यात आले.
 
हे प्रकरण पत्रकार पेट्रीसिया कॅरवलेस हिच्यासोबत घडले. तिने ट्विटरवर आपल्या बाह्याचा फोटो देखील शेअर केला.
 
घटनेची माहिती पुरवत तिने लिहिले की, 'मला संसदेतून बाहेर काढण्यात आले कारण त्यांना माझे उघडे दिसत होते. हा मूर्खपणा आहे. परंतू अटेंडेंटच्या सांगण्यावरून मी बाहेर पडले. आजच्या परिप्रेक्ष्यानुसार असे नियम योग्य नाही असे मला वाटतं.'
 
मग काय सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अनेक महिलांनी तिला पाठिंबा देत लहान बाह्या असलेल्या ड्रेसमध्ये आपले फोटो शेअर करणे सुरू केले.