गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'ठाकरे'मध्ये माँसाहेबांची भूकिासाकारणार अमृता

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवसेना पक्षप्रुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी या चरित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणार असल्याची बामती गेल्या अनेक दिवसांपूर्वी समोर आली आहे. पण या चित्रपटाबद्दलची नवी माहिती आता समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव या चित्रपटात बाळासाहेबांच्या पत्नीच्या म्हणजेच मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. मीनाताईंशी बाळासाहेबांनी 13 जून 1948 ला विवाह केला होता. चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांच्या मते, अमृताच्या चेहर्‍यावरील निरागस आणि निष्पाप भावामुळे ती या भूमिकेसाठी उत्तम आहे. पण याबद्दलची अधिकृत घोषणा अमृताने अजूनही केलेली नाही. बॉलिवूडमध्ये 'अब के बरस' या चित्रपटातून पदार्पण केलेली ही अभिनेत्री गेल्या बर्‍याच वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. ती 2013 मध्ये शेवटची 'सिंग साहब द ग्रेट' या चित्रपटात झळकली होती. त्यामुळे, अमृताचा हा कमबॅक तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे.