मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आनंद वर्धनचे कमबॅक

'सूर्यवंशम' हा अमितेभ बच्चन यांचा सिनेमा माहीत नसणारा क्वचितच सापडेल. टीव्हीवर हा सिनेमा इतक्यांदा दाखवण्यात आला की, अनेकांना तर हा सिनेमा तोंडपाठ झाला असेल. हा सिनेमा तसा फ्लॉप झाला होता पण टीव्हीवर तो अनेकांनी पाहिला. या सिनेमात अमिताभ यांचा डबल रोल होता. यातील हिराच्या मुलाची भूमिका बालकलाकार आनंद वर्धन याने साकारली होती. इतक्या वर्षांनंतर हा लहान मुलगा आता कसा दिसतो हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता नक्कीच असेल. हिरा ठाकूर आणि राधाचा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून तो तेलुगू सिनेमाचा स्टार आनंद वर्धन आहे. 'सूर्यवंशम'च्या एका सीनमध्ये अमिताभला विष असलेले जेवण देताना तो तुम्हाला आठवला असेल. त्यावेळी त्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. आता हा सिनेमा येऊन 18 वर्षं झाली आहेत. या 18 वर्षात आनंद वर्धन फार बदलला आहे. आनंद आता फार हॅन्डसम झाला आहे. 12 वर्ष तो इंडस्ट्रीपासून दूर राहिला असला तरी लहान वयातच अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारासोबत काम केल्याने तो कायम चर्चेत होता. त्याने त्याच्या करिअरची सुरुवातच सौंदर्याच्या सिनेमातून केली होती. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो 12 वर्ष इंडस्ट्रीपासून दूर होता आणि लवकरच तो टॉलिवूडमध्ये दिसू शकतो. सध्या तो काही स्क्रीप्ट वाचतो आहे. अपेक्षा करूया की, लवकरच तो मोठ्या सिनेमात दिसेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करेल. आनंद आता सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतो आणि आपले खास फोटो शेअर करत असतो.