बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रिचा बनणार शकिला

रिचा चढ्ढा बहुमुखी प्रतिभावान अभिनेत्री आहे व आपल्या करिअरमध्ये तिने ही गोष्ट वारंवार सिद्ध केली आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती नृत्य व गायनामध्येही निष्णात आहे. त्याचबरोबर तिने एका शॉर्ट फिल्मचे लेखन व दिग्दर्शनही केले आहे. रिचा एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. गँग्स ऑफ वासेपूर मालिकेद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणार्‍या या अभिनेत्रीला तेव्हापासूनच शानदार रिव्ह्यू मिळू लागले आहेत. तिच्यातील योग्यता ही सर्वांनीच हेरली आहे व त्यामुळेच की काय, तिला आता इंद्रजित लंकेशच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या बायोपिकमध्ये शकिलाच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये रिचा टायटल रोलमध्ये दिसून येणार आहे, ज्याच्या शूटिंगला ऑगस्टमध्ये सुरुवात होणार आहे. विद्या बालनद्वारे डर्टी पिक्चरमध्ये सिल्क स्मिताची भूमिका यशस्वीपणे साकारण्यात आल्यानंतर बॉलिवूडमध्ये ही भूमिका अत्यंत खास मानली गेली. सिल्कच्या अगदी उलट शकिलाचे नाव दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय होते व तिचे यश अभिनेत्यांइतकेच होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना शकिला खानची भूमिका साकारायची होती. काही अभिनेत्रींनी तर साऊथमध्ये जाऊन फिल्ममेकर्सची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. हुमा कुरैशी व स्वरा भास्करसारख्या अभिनेत्रीही या शर्यतीत होत्या, परंतु अखेरीस मसानच्या या अभिनेत्रीने बाजी मारली.