1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मलायका गरोदर ? बॉयफ्रेंड अर्जुन कपूरची प्रतिक्रिया वाचा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा खूप लोकप्रिय आहे. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. अभिनेत्री तिच्या लव्ह लाईफ, मूव्ह्स आणि डान्सच्या बाबतीत सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. अलीकडेच या अभिनेत्रीबद्दलची एक खोटी बातमी समोर आली होती, ज्याचे सत्य सांगून तिचा प्रियकर अभिनेता अर्जुन कपूरने पडदा हटवला आहे.
 
अर्जुनने नोव्हेंबरमध्ये एक सोशल मीडिया पोस्ट केली होती
खरं तर काही लोकांनी नोव्हेंबरमध्ये दावा केला होता की अभिनेत्री मलायका अरोरा प्रेग्नंट आहे, ज्यामुळे तिचा बॉयफ्रेंड चिडला होता. अर्जुन कपूरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये याला अफवा म्हटले आहे आणि ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले आहे. त्याने फटकारत लिहिले की, 'यापेक्षा जास्त खालच्या पातळीला जाऊ शकत नाही. हे पूर्णपणे अनैतिक आहे. मी अशा बातम्यांकडे सतत दुर्लक्ष करत होतो आता ते सत्य म्हणून पसरवले जात आहेत. हे योग्य नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळू नका. गेल्या वर्षीची ही पोस्ट खूप व्हायरल झाली.
आता याबद्दल खुलेपणाने बोलला
आता या अभिनेत्याने मुलाखतीत याबद्दल बोलला आहे. तो म्हणाला की 'नकारात्मक गोष्टी पसरवणे खूप सोपे आहे कारण लोक अशा बातम्यांकडे आकर्षित होतात. या अफवा बराच काळ गाजत आहेत. यासोबतच अर्जुन कपूर म्हणाला की, कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य वैयक्तिक राहत नाही याची मला जाणीव आहे. त्यांना अशा अफव झेलत जगावे लागते. तसेच त्याने म्हणले की, कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांवर अवलंबून राहावे लागते, परंतु याचा अर्थ अफवा पसरवाव्यात असे नाही. अशा बातम्या लिहिण्याआधी अभिनेत्यांकडून खात्री करून घ्यावी.
 
दोघे डेटिंग करत आहेत
मलायका अरोरा आणि अर्जुन कपबर हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आतापर्यंत दोघांनीही लग्नाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, मलायकाच्या गरोदरपणाची खोटी बातमी समोर आली, ज्याचा अर्जुनला राग यायला लागला होता. तसे दोन्ही अभिनेते सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत आणि एकमेकांसाठी प्रेमळ पोस्ट शेअर करत असतात.