गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (11:02 IST)

Arun Bali Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, 'स्वाभिमान' आणि '3 इडियट्स' मधील संस्मरणीय भूमिका

अरुण बाली यांचे निधन. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज पहाटे निधन झाले. अरुण बाली यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करून लोकांची मने जिंकली आहेत. अरुण बाली यांनी वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बाली हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि आज पहाटे साडेचार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले होते.

अरुण बालीने 1991 मध्ये प्रसिद्ध नाटक चाणक्यमधील राजा पोरस, दूरदर्शनच्या स्वाभिमान मालिकेतील कुंवर सिंग यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. 2000 च्या दशकात, कुमकुममधील हर्षवर्धन वाधवा सारख्या "आजोबा" भूमिकेसाठी ते ओळखले गेले. ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट आणि मालिका निर्माते देखील होते. 'स्वाभिमान' आणि '3 इडियट्स' मधील त्यांनी संस्मरणीय भूमिका निभावली होती. 

Edited by : Smita Joshi