बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑक्टोबर 2018 (08:12 IST)

‘बधाई हो’ची बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असून श्रद्धा कपूर- राजकुमार रावच्या ‘स्त्री’चित्रपटालाही मागे टाकलं आहे.प्रदर्शनाच्या दिवशी ‘बधाई हो’या चित्रपटाने जवळपास ७.२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आयुषमानच्या करिअरमधील हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर तीन दिवसांत कमाईचा आकडा ३१.४६ कोटी इतका झाला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुट्ट्यांचाही चांगला फायदा झाला आहे.प्रदर्शनानंतर लागोपाठ सुट्ट्या आल्याने रविवारच्या कमाईच्या आकड्याचा अंदाज लावल्यास एकूण कमाई सुमारे ४५ कोटींच्या घरात जाणार असल्याची शक्यता आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने हा अंदाज वर्तवला आहे. केवळ भारतातच नाही तर ऑस्ट्रेलियातही आयुषमानच्या या चित्रपटाने कमाल केली आहे.