रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 24 जून 2022 (08:48 IST)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी वर्षा हे त्यांचे शासकीय निवासस्थान सोडून ‘मातोश्री’वर परतले. महाराष्ट्रातील तसेच शिवसेनेवरील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना राणावत, “उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटतं? चित्रपट माफियांशी हातमिळवणी करून तुम्ही माझे घर पाडले आहे? आज तुम्ही माझे घर पाडले आहे. उद्या तुमची घमंड गळून पडेल” असे म्हणताना दिसत आहे.