बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (12:00 IST)

प्रियंका चोप्राला मिळत नाही MR.Right

बॉलीवूड एक्ट्रेस प्रियंका चोप्राने नुकतेच आपल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिचे म्हणणे आहे की ती योग्य व्यक्तीच्या शोधात आहे. तसेच तिने म्हटले की लग्नाबद्दल कोणी कुठलेही प्लानिंग करू शकत नाही. झी सिने अवॉर्ड्समध्ये सामील झालेली  प्रियांका चोप्राला मीडियाने लग्नाबद्दल विचारले? यावर तिने म्हटले की, "लग्न प्लानिंगने होत नाही. तुम्हाला तुमच्यासाठी योग्य व्यक्तीच्या शोध करावा लागतो. जर मला योग्य व्यक्ती मिळेल तर मी लगेच लग्न करून घेईन. 
 
बॉलीवूड चित्रपटांबद्दल विचारल्यावर प्रियंका म्हणाली की तिला राकेश शर्माच्या बायोपिकसाठी कॉन्टॅक्ट करण्यात आले होते, ज्यात आमिर खान लीड रोलमध्ये आहे. हे चित्रपट सिद्धार्थ राय कपूर आणि महेश मथाई यांच्या डायरेक्शनमध्ये तयार होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रियंका नुकतीच देशात परतली आहे. तिने सांगितले की ती फक्त सुट्यांमध्ये घरी आली आहे. त्याशिवाय तिला दुसरे कुठलेही काम नाही आहे.  
 
तसे तर मुंबई एयरपोर्टवर तिचे फारच चांगल्या पद्धतीने स्वागत झाले आहे. एयरपोर्टवर एका महिला ऑटोग्राफ घेण्यासाठी पुढे आली आणि प्रियंकाला भेटल्याबरोबरच तिला किस केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार वायरल होत आहे.