बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (15:23 IST)

मिलिंद सोमन-अंकिता कोनवारला लग्नबंधनात अडकणार

देशाचा पहिला सुपर मॉडेल, अभिनेता आणि आयर्न मॅन मिलिंद सोमन आता अंकिता कोनवारला हिला अनेक  दिवसांपासून डेट केल्यानंतर लवकरच  लग्नबंधनात अडकणार आहे. दोघे पुढल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये लग्न करणार आहेत. 

अंकिताचे वय हे २३ किंवा २४ असू शकेल तशीच ती एअरहोस्टेस असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मिलिंद ५२ वर्षाचे आहेत. मिलिंद नुकतेच अंकिताच्या कुटुंबाला भेटले आहे. आणि हे दोघे लवकरच सगळ्यांच्या सहमतीने लग्न करणार आहे. मिलिंदने अंकिताच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी तिच्या भाच्याच्या बर्थ डे पार्टीचं निमित्त निवडलं. याच दरम्यान संपूर्ण कुटुंबियांची ओळख झाली. 

अंकिताच्या कुटुंबातील सगळेजण त्या दोघांच्या वयाच्या अंतरातील फरकामुळे चिंतेत होते. मात्र एकदा मिलिंदला भेटल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आहेत. आणि त्यांनी मिलिंद सोमणला एका खरेपणाने स्विकारलं आहे. या कुटुंबियाला मिलिंदचा स्वभाव भरपूर आवडला असून त्यांनी लग्नाला मंजूरी दिली आहे.