रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2024 (11:27 IST)

बॉलिवूडच्या रामूने दिले दमदार चित्रपट, आज ६२ वा वाढदिवस

Ram Gopal Varma
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट निर्माते झाले आहेत ज्यांनी प्रेक्षकांना दमदार सिनेमा दिले आहेत. राम गोपाल वर्मा हे देखील त्यापैकीच एक असून, चित्रपट इंडस्ट्रीत त्याला रामू म्हणनही ओळखले जाते. आज रामू आपला ६२ वा वाढदिवस साजरा करत आहे. एकेकाळी रामूचं बॉलिवूडवर राज्य होतं. तो त्याच्या माफिया-डॉन चित्रपटांसाठी लोकप्रिय आहे. रामू हा अशा दुर्मिळ चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे ज्यांनी बॉक्स ऑफिसचा विचार न करता पुढे जाऊन त्या काळात बॉक्स ऑफ द बॉक्स चित्रपट बनवले, रामूच्या अशाच काही दमदार चित्रपटाबद्दल  जाणून घेऊया.
 
रंगीला
आमिर खान, उर्मिला मंटोडकर आणि जॅकी श्रॉफ यांचा हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक हिट आहे. त्याची कॉमेडी आणि आमिर खानचा अभिनय कायमचा अजरामर झाला. चित्रपटातील आमिरची टपोरी स्टाइल खूप आवडली होती. या रोमँटिक ड्रामाने राम गोपाल वमार्ला बॉलिवूड चित्रपटसृष्टीत खूप नाव मिळवून दिले. समीक्षकांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले होते.
 
सत्या
मनोज बाजपेयी आणि अभिनेता चक्रवर्ती यांचा चित्रपट सत्या हा एक अप्रतिम सिनेमा आहे. हा चित्रपट रामूच्या कारर्किर्दीतील सर्वोत्तम चित्रपट मानला जाते. सत्या हा एक क्राईम थ्रिलर आहे जो मुंबईच्या अंडरवर्ल्डभोवती फिरतो. यामध्ये उर्मिला मातोंडकर आणि शेफाली शहा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. गुन्हेगार अंडरवर्ल्डच्या चित्रणासाठी या चित्रपटाची समीक्षकांनी प्रशंसा केली आणि अनेक पुरस्कार जिंकले होते. या चित्रपटातील मनोज बाजपेयीची भिकू म्हात्रे ही व्यक्तिरेखा खूप गाजली होती.तर सत्यामधील ‘सपने में मिलती है ’ या गाण्याने चांगलीच खळबळ उडवून दिली होती.
 
शिव
साऊथ सुपरस्टार नागार्जुन स्टारर शिवा हा राम गोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला अतिशय लोकप्रिय चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. शिवा हा एक धोकादायक क्राईम-थ्रिलर आहे जो कॉलेज कॅम्पसमध्ये सेट केला आहे. नागार्जुनचा अभिनय आणि कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती.
 
सरकार
राम गोपाल वमार्चा चित्रपट सरकार, द गॉडफादरपासून प्रेरित, एक प्रसिद्ध राजकीय-गुन्हेगारी थ्रिलर आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. मनोरंजक कथा आणि दमदार अभिनयासाठी या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. साकारचा मुलगा शंकरची भूमिका साकारणा-या अभिषेक बच्चनने या चित्रपटात सर्वोत्कृष्ट अभिनय केला आहे, अभिषकच्या कामाचे त्यावेळी प्रेक्षकांनी खुप कौतुक केले होते.

Edited By- Ratnadeep ranshoor