रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (08:15 IST)

विनोदी अभिनेता विजय राजवर गोंदियात विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन अटक

विनोदी अभिनेता विजय राजवर गोंदियात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत असलेला आगामी चित्रपट ‘शेरनी’ची चित्रीकरण सध्या मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सुरू आहे. या चित्रपटात विनोदी अभिनेता विजय राजदेखील  महत्त्वाची भूमिका सकारात होते. मात्र, या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप लावण्यात आला आहे. क्रू मेंबरमधल्या 30 वर्षीय युवतीची छेड काढल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. 
 
‘शेरनी’ चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाफ हे गोंदियातील प्रसिद्ध हॉटेल ‘गेटवे’ येथे मागील पंधरा दिवसांपासून वास्तव्यास आहेत. चित्रिकरणादरम्यान आणि हॉटेलमध्ये अभिनेता विजय राज यांनी आपली छेड काढल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. युवतीची छेड काढल्याच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलीसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक केली आहे.