बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2019 (11:54 IST)

'भारत' चे चित्रीकरण पूर्ण

नुकतेच 'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. कतरिना कैफनेसलमान खानसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच सलमान खानसोबतचा फोटो शेअर करीत कतरिनाने लिहिले की, 'भारत'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. माझ्यासाठी हे खूप इंटरेस्टिंग भूमिका होती. चित्रपट बनण्याची पूर्ण प्रोसेस खूप प्रेरणादायी होती. यासोबतच अली अब्बास जफर, सलमान खान व अतुल अग्निहोत्री बेस्ट बॉइज व अलवीरा खान बेस्ट गर्ल असे लिहित आभारही मानलेत. 
 
ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.