बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (11:06 IST)

कमाईचा केला नवा विक्रम

बॉलिवूड अ‍ॅक्टर अक्षय कुमार आणि दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या '2.0' या चित्रपटाने रीलिजपूर्वीच कमाईचा नवा विक्रम नोंदविला आहे. या चित्रपटाने इतकी कमाई केली आहे की, तो रीलिज झाल्यानंतर प्रेक्षकांना जरी पसंत पडला नाही तरी निर्मात्यांना कसलेच नुकसान होणार नाही. '2.0' हा बिग बजेट असलेला आणखी भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटास 400 ते 500 कोटी रुपयांचा खर्च आल्याचे बोलले जात होते. मात्र, ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात रजनीकांत यांनी याचित्रपटाचे बजेट एकूण 550 ते 600 कोटी असल्याचे सांगितले. तरीही सुमारे 543 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 490 कोटींची कमाई केल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत तमिळ भाषेत या चित्रपटाचे 120 कोटींचे बुकिंग झाल्याचे म्हटले जाते. '2.0' या अक्षय-रजनीच्या चित्रपटाने सॅटेलाईट राईटस्‌, डिजिटल राईटस्‌ आणि डिस्ट्रिब्यूशन राईटस्‌मधून 370 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेतील डिजिटल राईटस्‌ 60 कोटींना विकले गेले आहेत. तर लाईका प्रॉडक्शनने या चित्रपटाचे सॅटेलाईट राईटस्‌ 120 कोटींना विकले आहेत. अशा पद्धतीने या चित्रपटाने रीलिज होण्यापूर्वीच सुमारे 490 कोटी रुपयांची घशघशीत कमाई केली आहे.