शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (14:43 IST)

सोनालीच्या प्रकृतीबद्दल खुलासा, सोनाली पूर्वीपेक्षा बरी

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. सध्या तिच्या प्रकृतीबद्दल सोनालीची नणंद सृष्टी आर्याने खुलासा केला. सृष्टी यांनी सांगितले की, सोनाली पूर्वीपेक्षा बरी आहे. तिच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. पुढे त्यांनी सांगितले की, सोनाली खूप खंबीर आहे. ती ही लढाई चांगलीच लढेल असे म्हटले आहे. 
 
काही दिवासांपूर्वी सोनालीने मुलगा रणवीरसोबतचा फोटो शेअर केला होता. रणवीरला कॅन्सरबद्दल समजताच त्याने सोनालीला कसा आधार दिला, याचाही खुलासा तिने सोशल मीडिया पोस्टद्वार केला. त्यात तिने लिहिले की, आम्ही त्याला कॅन्सरबद्दल सांगितले आणि त्याने खूप समंजसपणे ते स्वीकारले. इतकंच नाही तर मला आधार दिला. सध्या त्याचे व्हेकेशन चालू असल्यामुळे मी रणवीरसोबत वेळ घालवत आहे. मला आवश्यक त्या प्रत्येक गोष्टीची तो मला आठवण करुन देत आहे.