गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त..
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त..
टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला. स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे रत्न होते. त्यांचे केशव हे नांव ठेवण्यात आले होते. पण ते बाळ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेस होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाली. वडिलांचे छत्र 19 व्या वर्षी निवर्तले. 16 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न 17व्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशाची फारशी अडचण भासली नाही. 1876 साली टिळक बी. ए. ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांचे गणित व संस्कृत हे दोन विषय उत्तम होते. पुढे टिळकांनी एल. एल. बी. पर्यंत मजल मारली.
महाविद्यालामध्ये टिळक असतांना गोपाळ गणेश आगरकर या तरुण मित्राची मैत्री जमली. दोघेही एका विचाराची मने घेऊनी चर्चा करीत. देशात सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य हे झाले पाहिजे. आगरकरांचा विषय तत्त्वज्ञान तर टिळक गणितवाले जोडणारे तोडणारे पण मातृभूमीबद्दल खळबळ आंतरिक एकत्र आले की चर्चा असे विद्यार्थी हवे आहेत. असतीलही कदाचित. दोघांवर पाश्चात्य विचारवंत मिल व स्पेन्सर यांचा प्रभाव होता. यातूनच 2 जानेवारी 1880 ला पुणमध्ये नू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली.
WD
1907 मध्ये सुरतला काँग्रेसचे अधिवेशन झाले. तिथे जहाल व मवाळ गट असे होऊन अधिवेशन उधळले गेले. टिळकांनी तरुणांना साहसी कृत्ये न करण्याची, किंग्ज फोर्डला धडा शिकविण्याचा सल्ला दिला. पुढे पां. म. बापट यांनी बॉम्बचे मॅनुअल बंगालमधील तरुणांना मिळाले. त्याचे पडसाद उमटले. शेवटी टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन टिळकांना 6 वर्षे ब्रह्मदेशातील मंडाले येथे नेले. टिळकांनी कारागृहात रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ केवळ चार महिन्यांत पूर्ण केला.
मंडाले येथून सुटल्यावर ‘पुनश्च हरी ओम्’ ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणजेत मालवली.
‘दिव्यत्त्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’
सुधाकर कुळकर्णी
