1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

कठिण प्रश्नांना काय घाबरायचं?

bodh katha
लोकमान्य टिळक लहानपणापासूनच खूप साहसी होते. गणित आणि संस्कृत त्यांचे आवडते विषय होते. शाळेत त्यांची परीक्षा असली की ते गणिताच्या प्रश्न पत्रातील सर्वात कठिण प्रश्न सोडवत होते. 
 
त्यांच्या या सवयीवर त्यांच्या एका मित्राने विचारले की तुम्ही नेहमी अवघड प्रश्न का सोडवतात? सोपे प्रश्न सोडवाल तर परीक्षेत नेहमी चांगले गुण मिळतील.
 
यावर टिळक यांनी उत्तर दिलं की मी अधिकाधिक शिकू बघतो म्हणून कठिण प्रश्न सोडवतो. आम्ही नेहमी सोपा मार्ग निवडला तर काही नवीन शिकणार तरी कसं. 
 
हीच गोष्ट आमच्या आविष्यावर देखील लागू होते. जर आम्ही नेहमी सोपे विषय, सोपे प्रश्न आणि साधारण काम शोधत राहिलो तर कधी पुढे वाढू शकणार नाही. 
 
जीवनातील कठिण वळण आवाहन म्हणून स्वीकारा, त्या पुढे गुडघे टेकण्याऐवजी जिंकून दाखवा.