प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन
भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. पंडित शिवकुमार शर्मा यांचे सिनेजगतात महत्त्वाचे योगदान आहे. बॉलिवूडमध्ये 'शिव-हरी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया या जोडीने अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या 'चांदनी' चित्रपटातील 'मेरे हाथों में नौ नौ चुड़ियाँ' हे सर्वात प्रसिद्ध होते.
15 मे रोजी कॉन्सर्ट होतं
मिळालेल्या माहितीनुसार, पंडित शिवकुमार शर्मा यांचा 15 मे रोजी एक कॉन्सर्ट होणार होता. त्यांचे सूर ऐकण्यासाठी अनेकजण आतुर होते. लाखो लोक शिव-हरी (शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया) च्या जुगलबंदीने आपली संध्याकाळ उजाडण्याची वाट पाहत होते. पण या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी शिवकुमार शर्मा यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.