गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (09:03 IST)

हृतिक आणि सुझान यांचे पुन्हा लग्न ?

hritik roshan

अभिनेता हृतिक आणि सुझान कदाचित पुन्हा लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. हृतिक आणि सुझानला आता पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याची इच्छा आहे. त्यांनी आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा विचार केला असून, त्यादिशेने त्यांनी तसे पाऊलही उचलले आहे. तसेच, त्यांच्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. 

याआधी घटस्फोटानंतरही हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. सुझान नेहमीच हृतिकच्या पाठीशी उभी राहिली. कंगनासोबतच्या वादातही तिने आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीची साथ सोडली नाही.