शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (16:26 IST)

थक गा हूं, रिटायर हो रहा हूं

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीपासून वेगळे होत आहेत का? त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवरून असाच अंदाज वर्तविला जात आहे. वास्तविक कौन बनेगा करोडपतीचा 12 वा हंगाम सध्या सुरू आहे. नुकतेच अमिताभ  बच्चन यांनी ब्लॉग पोस्ट लिहून माहिती दिली आहे.
 
अमिताभ यांनी लिहिले आहे, ‘मैं थक चुका हूं और रिटार हो रहा हूं, मैं माफी चाहता हूं।' केबीसी की शूटिंग का यह आखिरी दिन काफी लंबा था, कल तक ठीक हो जाऊंगा. पण लक्षात ठेवा की, काम काम आहे. त्याने पुढे ही जोड दिली की तुमची आपुलकी आणि प्रेम यामुळे शूटिंगचा शेवटचा दिवस विदाईसारखा वाटतो. तेथे सर्व लोक एकत्र येतात. थांबण्याची कधीच इच्छा नसते. मला आशा आहे की हे लवकरच पुन्हा सुरू होईल. संपूर्ण टीम खूप प्रेमळ, काळजी घेणारी आणि कष्टकरी आहे. मला या सर्व गोष्टींमुळे आमच्या सेटपासून दूर जाणे कठीण वाटते. शेवटी संपूर्ण टीम एकत्रित वेळ आणि प्रत्येक प्रयत्न लक्षात ठेवण्यात व्यस्त होते. शेवटी त्यांनी लिहिले, प्रेम, काळजी आणि चांगल्या वागणुकीसाठी संपूर्ण टीमचे मनापासून आभार. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोविड-19 मधून सावरल्यानंतर बिग बी यांनी केबीसी सीझन 12 च्या शूटिंगला सुरुवात केली होती.