Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

''आपला समाज मुलींवर संस्‍कार घडवतो, पण चांगले पती घडवण्‍यामध्‍ये असमर्थ ठरतो'': जया प्रदा

Updated: बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (17:46 IST)
  
अनेक नाट्यमय घटना असलेल्‍या या मालिकेमध्‍ये जया प्रदा राज्‍यश्री राठोडची भूमिका साकारताना दिसणार आहे. ती योग्‍य गोष्‍ट करण्‍यासाठी आणि तिची सून विधिताला (साना अमिन शेख) न्‍याय देण्‍यासाठी तिचा स्‍वत:चा मुलगा पुष्‍करला (आयुष आनंद) ठार करणार आहे. राज्‍यश्रीला माहित होते की,  तिचा मुलगा व सूनेच्‍या वैवाहिक जीवनामध्‍ये अनेक समस्‍या होत्‍या. पण आता सत्‍य उघडकीस आले आहे की, तिच्‍या मुलाचे वर्तन एका मनोरूग्‍णाप्रमाणे आहे आणि त्‍याने जीवापाड प्रेम करत असलेल्‍या पत्‍नीला, म्‍हणजेच विधिताला मारण्‍याचा प्रयत्‍न केला होता. धक्‍कादायक क्‍लायमॅक्‍समध्‍ये राज्‍यश्री बंदूकीने तिच्‍या स्‍वत:च्‍या मुलाला गोळी मारते, जे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्‍यंत रोमांचक असणार आहे. तिच्‍या या कृत्‍यामधून समाजाला एक महत्‍त्‍वपूर्ण संदेश दिला जाणार आहे, तो म्‍हणजे खासकरून मातांनी त्‍यांच्‍या मुलांचे संगोपन चांगल्‍याप्रकारे करणे गरजेचे आहे. 
 
या अपारंपारिक संकल्‍पना आणि कथेमध्‍ये लेखकांनी घेतलेल्‍या धाडसी पावलाबाबत बोलताना जया प्रदा म्‍हणाली, ''मला 'परफेक्‍ट पति'सह टेलिव्हिजनवर पदार्पण केल्‍याचा आनंद होत आहे. ही मालिका एक आई आणि सासू म्‍हणून तिच्‍या प्रबळ भूमिकेवर प्रकाश टाकते. मातांनी त्‍यांच्‍या मुलांचे वर्तन समजून घेणे आणि त्‍यांच्‍या मुलांच्‍या कोणत्‍याही वाईट कृत्‍याकडे किंवा दोषाकडे दुर्लक्ष करू नये, जे आजच्‍या काळात अनिवार्य आहे. भारतीय समाज अनेक दशकांपासून मुलींना भावी चांगली पत्‍नी (संस्‍कारी सून) बनवण्‍याच्‍या हेतूने त्‍यांच्‍यावर संस्‍कार करत आला आहे. पण आपला समाज त्‍यांच्‍यासाठी पात्र असलेले चांगले पती घडवण्‍यामध्‍ये असमर्थ ठरला आहे. मुली मोठ्या होत असताना त्‍यांना समजावले जाते की, त्‍यांनी कोणत्‍याही स्थितीमध्‍ये पतीचा स्‍वीकार केला पाहिजे. वैवाहिक जीवनामध्‍ये कितीही भांडणे, समस्‍या असोत सतत पतीसोबतच राहिले पाहिजे. मातांनी त्‍यांच्‍या मुलांमध्‍ये बालपणापासून चांगली मूल्‍ये रूजवणे, त्‍यांच्‍यावर चांगले संस्‍कार घडवणे अत्‍यंत अनिवार्य आहे. ज्‍यामुळे ते महिलांचा आदर करतील. मला आनंद होण्‍यासोबतच अभिमानही वाटत आहे की, &TVने प्रबळ पुढाकार घेत माझ्या मालिकेच्‍या माध्‍यमातून हा महत्‍त्‍वपूर्ण संदेश देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.''  
 
या महत्‍त्‍वपूर्ण विषयाबाबत अधिक बोलताना ती पुढे म्‍हणाली, ''राज्‍यश्रीचे तिच्‍या मुलावर खूप प्रेम आहे. पण ती मुलाच्‍या गैरवर्तणूकीला आणि विधिताविरुद्धच्‍या अन्‍यायाला पाठिंबा देण्‍याला नकार देते. हा एक मोठा बदल आहे. ती अन्‍यायापेक्षा न्‍यायाची निवड करते आणि एक धक्‍कादायक पाऊल उचलते. प्रेक्षकांना हा बदल लवकरच पाहायला मिळणार आहे.'' 
तुम्‍हाला क्‍लायमॅक्‍स निश्चितच पाहायला आवडेल!

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

अनिल कपूर लवकरच 'इंडियाज टॉप 1Percent' हा नवीन गेम शो घेऊन येत आहेत

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

अभिनेते मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल; शस्त्रक्रिया झाली

मुख्यमंत्री विजय यांच्या पत्नी संगीता यांनी घटस्फोट याचिका मागे घेतली

यश राज फिल्म्स पहिल्यांदाच एक हॉरर चित्रपट बनवणार असून, त्यात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार

पुढील लेख
Show comments