शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 मार्च 2018 (11:21 IST)

पुन्हा नकारात्क भूमिकेत दिसणार जुही

अभिनेत्री जुही चावलाला आपण अर्जुन पंडित, तसेच गुलाब गँगसारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारताना पाहिले आहे, परंतु आता जुही पुन्हा एकदा अशा भूमिकेत पाहायला ळिणार आहे. अरशद वारसीच्या मुख्य भूमिका असलेल्या एका चित्रपटामध्ये जुही निगेटिव्ह रोल करताना दिसून येणार आहे. या चित्रपटाचे टायटल अद्याप निश्‍चित झालेले नाही. मात्र जुहीने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून, आपली ही भूमिका खूप आव्हानात्मक असेल, असे तिचे म्हणणे आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना जुही म्हणाली की, अर्जुन पंडित व गुलाब गँगनंतर आपण आता तिसर्‍यांदा निगेटिव्ह रोल करणार आहोत व मला वाटते की, ही भूमिका खूप आव्हानात्मक आहे. या चित्रपटामध्ये अरशद व जुही व्यतिरिक्त दिव्या दत्ता देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.