शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (16:55 IST)

राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा

65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून रवी जाधव दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे, तर, 'सैराट'चा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. ही सर्व घोषणा प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

मराठी चित्रपट : 

* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू

* सर्वोत्कृष्ट लघुपट - मय्यत

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - नागराज मंजुळे (लघुपट - पावसाचा निबंध)

* विशेष उल्लेखनीय चित्रपट - म्होरक्या

* सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या

* सर्वोत्कृष्ट संकलन - मृत्युभोग

* सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा

बॉलिवूडमधील पुरस्कार : 

* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी

* सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - बाहुबली 2 

* सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ए. आर. रेहमान (मॉम) 

* सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - गणेश आचार्य (गोरी तू लठ मार)