मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कादर खान यांचं निधन, अमिताभ यांनी या प्रकारे काढली आठवण

kadar khan death
ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झाले आहे. 
 
अभिनेता आणि लेखक केदार खान यांच्या निधनानंतर मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की ते सर्वात प्रतिभावान व्यक्ती होते, उल्लेखनीय आहे की खान बर्याच काळापासून पीडित होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. कॅनडातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अंत्य संस्कार कनाडा येथे होणार.

 
अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये जन्म झालेल्या कादर खान यांना अत्यंत हालाखीत दिवस काढावे लागले होते. मुंबईतील झोपडपट्टीत बालपण गेले असून आईच्या प्रचंड कष्टामुळे त्यांचे आयुष्य पालटले.
 
कादर खान यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. खान यांनी अनेक चित्रपटांसाठी संवादलेखनदेखील केलं. 250 पेक्षा जास्त चित्रपटांचं संवाद लेखन त्यांनी केलं. आपल्या दिलखुलास अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या एक महान कलाकराची कमी सम्पूर्ण बॉलीवुडला जाणवत आहे.