मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (12:20 IST)

परत दिसला मौनी रॉयचा ग्लॅमर्स अंदाज, सोशल मीडियावर फोटोशूट वायरल

टीव्ही शो 'नागिन'पासून चाहत्यांच्या मनात घर करणारी अॅक्ट्रेस मौनी रॉय तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत राहते. छोट्या पडद्यावरून आपल्या  अभिनयाची सुरुवात करणारी मौनी रॉयने चित्रपट गोल्डपासून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते. नुकतेच तिचे चित्रपट रॉ रिलीज झाली आहे.  
मौनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यासोबतच सोशल मीडियावर देखील फार अॅक्टिव्ह राहते. इंस्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओची भरमार आहे. नुकतेच मौनीने एक फोटोशूट केले आहे.  
या फोटोशूटमध्ये मौनी प्रिटी सिंपल ट्रेड आणि ग्रीन कॉटन ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये मौनी रॉयचे ग्लॅमर्स लुक बघायला मिळत आहे.  मौनीचा हा फोटोशूट तिच्या चाहत्यांना फार पसंत पडत आहे.  
मौनीच्या या फोटोंवर 4 लाखापेक्षा जास्त लाइक्स आले आहे. मौनी रॉयचे चित्रपट रोमियो अकबर वॉल्टर रिलीज झाली आहे. यात तिच्या अपोजिट जॉन अब्राहम दिसला.  
मौनी रॉय आता लवकरच चित्रपट ब्रह्मास्त्रामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. त्याशिवाय मौनी रॉय चित्रपट मेड इन चाइनामध्ये राज कुमार रावसोबत आणि फिल्म बोले चूड़ियामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे.