शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 26 जुलै 2021 (13:19 IST)

संगीतकार अनु मलिकच्या आईचं निधन

Musician Anu Malik's mother dies
बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार अनु मलिकच्या आईचे २५ जुलै रोजी निधन झाले. काल दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडिया पोस्टद्वारे अनु मलिकच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत.
 
अरमान मलिक यांनी खूप भावनिक पोस्ट केली आहे. त्याने आपल्या आजीचे सर्वात चांगले मित्र म्हणून वर्णन केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अरमान आपल्या आजीसोबत दिसला आहे. सिंगरचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करून शोक व्यक्त करत आहेत.
 
वृत्तानुसार अनु मलिकची आई बिल्किस मलिक यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जुहू येथील रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

अरमानने आजीसोबतचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, 'आज माझा सर्वात चांगला मित्र गमावला ... माझी आजी. माझ्या आयुष्याचा प्रकाश.. या नुकसानाची मी कधीही पूर्तता करू शकत नाही. मला माहित आहे की ही जागा कोणीही भरू शकत नाही. आपण आजवर माझ्या आविष्यातील सर्वात लाडकी, सर्वात मौल्यवान व्यक्ती होती. मी स्वत:ला भाग्यवान समझेन की मला आजीसोबत इतका वेळ घालवायला मिळाला’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ARMAAN MALIK