शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2017 (17:16 IST)

धनुषच्या ‘व्हीआयपी २’चा टीझर बिग बींनी शेअर केला

नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि काजोल यांच्या ‘व्हीआयपी २’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. वेलैला पट्टधारी या चित्रपटाचा ‘व्हीआयपी २’ हा सिक्वल असून अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचा टीझर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. धनुष या चित्रपटासाठी फार उत्साहित असून त्याने ट्विट करत म्हटले की हा चित्रपट वेलैला पट्टधारीचा सिक्वल आहे.
 
काजोल या टीझरमध्ये कुठेच दिसत नाही. साधारणपणे २० वर्षांनंतर काजोल तामिळ चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात ती खलनायिकेची भूमिका साकारत आहे. तिने याआधी ही गुप्त चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी काजोलची एण्ट्री फार ग्रॅण्ड ठेवण्यात आली आहे. म्हणूनच चित्रपटाच्या टीझरमध्ये तिचा समावेश करण्यात आला नाही. पण टीझरमध्ये धनुषचा दमदार लूक अनेकांची मने जिंकून घेतो. व्हीआयपी २ चित्रपटात अनेक बदल करण्यात आले आहेत. पहिला चित्रपटा वेलराज यांनी दिग्दर्शित केला होता तर सिक्वलचे दिग्दर्श सौंदर्या रजनीकांत हिने केले आहे. २८ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.