शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 9 मे 2020 (09:55 IST)

नेहाचा स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स

लाखो तरुणांच्या मनावर आपल्या मधूर आवाजाने जादू करणारी बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका म्हणून नेहा कक्कर ओळखली जाते.

नेहाचे गाणच्या व्यतिरिक्त कॉमेडी आणि डान्स करतानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडिावर व्हारल झाले आहेत. सध्या सोशल मीडिावर नेहाचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हारल होत आहे. या व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे. एका फॅन पेजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा तिच्या आवाजात ‘चन्ना मेरेया ' हे गाणे गाताना दिसत आहे. तिच्या चेहरवरील हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहाने यूट्यूबवर जगभरातील टॉप सिंगरला मागे टाकत दुसर्‍या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

तिने सोशल मीडिावर पोस्ट करत याची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये तिने जगभरात यूट्यूबवर सर्वात जास्त पाहिल्या जाणार्‍या गायिकांची यादी शेअर केली आहे. या टॉप 10 गाकिांच्या यादीमध्ये नेहा कक्कर दुसर्‍या  क्रमांकावर आहे. या यादीमध्ये गायिका Cardi Bने 4.8 बिलिन व्ह्यूज यूट्यूबर मिळाले असून तिने पहिले स्थान पटकावले आहे. तर नेहा कक्करला 4.5 बिलियन व्ह्यूज मिळाले असून ती दुसर्‍या क्रमांकावर आहे. नेहाने कि केरल जी, ब्लॅकपिंक, सेलेना गोम्ज, बिली एलिस यांना मागे टाकल्यामुळे चाहते फार आनंदी असल्याचे दिसत आहे.