बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

पुन्हा बेबफिल्म नाही

'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री कियारा अडवाणी अलीकडे 'लस्ट स्टोरिज' या वेब फिल्मध्ये दिसली. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'लस्ट स्टोरिज' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील कियाराच्या भूकिेचीही प्रचंड चर्चा झाली. यात कियाराने हस्तमैथुनाचे दृश्य दिले होते. होय, यातील कियाराच्या हस्तमैथुनाच्या दृश्याने खळबळ उडवून दिली होती. आधी अभिनेत्री स्वरा भास्करचा'वीरे दी वेडिंग' या चित्रपटातील हस्तमैथुनाचा सीन वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. तो वाद शमत नाही, तोच 'लस्ट स्टोरीज'मधील कियारा अडवाणीच्या हस्तमैथुनाच्या दृश्याने खळबळ उडवून दिली होती. या दृश्यावेळी  'कभी खुशी कभी गम' हे गाणे वापरण्यात आल्याने मंगेशकर कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याचीही बातमी आली होती. या दृश्यामुळे कियाराची बरीचचर्चा झाली होती. एकंदर काय, तर या डिजिटल प्लॅटफॉर्मने  कियाराच्या करिअरला गती दिली. पण कियाराचे खरे मानाल तर या वेबफिल्ममध्ये काम करण्याची कियाराला अजिबात इच्छा नव्हती. करण जोहर या वेब‍फिल्मचा निर्माता आहे, केवळ आणि केवळ या एकाच कारणाने तिने ही वेबफिल्म स्वीकारली. पण यामुळे वेबफिल्म वा वेबसीरिजमध्ये काम करणार नाही, हे कियाराने ठरवून टाकलेय. मला कधीच डिजिट प्लॅटफॉर्मवर काम करायचे नव्हते. मला चांगल्या बॉलिवूड प्रोजेक्टची प्रतीक्षा होती. केवळ करणमुळे मी 'लस्ट स्टोरिज' केला. पण आता यानंतर मी कुठलीही वेबसीरिज वा वेबफिल्म करणार नाही, असे कियारा म्हणाली. लवकरच कियारा 'गुड न्यूज'मध्ये करिना कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. याशिवाय 'कलंक' या चित्रपटात कियारा कॅमिओ करताना दिसेल.