बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दोन हजार कोटींची मालकीण

असिनने आपल्या करिअरची सुरुवात साऊथ सिनेमातून केली आणि बॉलिवूडपर्यंत मजल मारली. 'नरेंद्रन मकान जयकंथान वाका' या सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तेव्हा ती फक्त 15 वर्षांची होती. लहानपणापासूनच असिनने तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांमध्ये काम केले आणि अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये तिने सलमान खान, अक्षयकुमार, आमिर खान आणि अभिषेक बच्चन   यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत सिनेमात काम केले. 

आमिर खानसोबतच्या गजनी सिनेमातून असिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनेक हिट सिनेमे दिले. आणि 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचा को फाऊंडर राहुल शर्मासोबत विवाहबद्ध झाली. असिनच्या साखरपुड्यानंतर तिची इंगेजमेंट रिंग खूप चर्चेत होती. या रिंगची किंमत सुारे 6 कोटी इतकी होती. राहुल शर्मा हा बिझनेसन असून तो बॅडमिंटन उत्तम खेळतो. 2014 मध्ये मायक्रोमॅक्सचा रेवेन्यू 10 हजार कोटी इतका होता. राहुल शर्मा या कंपनीचा को-फाऊंडर आहे. लग्नानंतर बॉलिवूड सोडून असिन पतीचा 2000 कोटींचा बिझनेस सांभाळत आहे.