1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (16:28 IST)

“पटेल की पंजाबी शादी’चा टीजर रिलीज ( व्हिडिओ )

patil ki punjabi shadi
कॉमेडी चित्रपट “पटेल की पंजाबी शादी’चा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. बॉलीवुडमध्ये यापूर्वी अनेक चित्रपटांतून इंटरस्टेट मॅरेज आणि पारंपारिक विवाह सोहळ्यासह त्यातून निर्माण होणाऱ्या विविध प्रसंग प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. या चित्रपटातही गुजराती मुलगी आणि पंजाबी मुलाच्या लग्नातील कॉमेडी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यात परेश रावल आणि ऋषि कपूर या दोन दिग्गज कलाकारांसह विर दासने हिरोची भूमिका साकारली आहे.
या टीजरमध्ये वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या कुटुंबातील मुलगा-मुलीच्या लग्नाचा प्रसंग दाखविण्यात आला आहे. मात्र, दोघांच्या परंपरामध्ये असलेल्या विविधतेतून त्यांच्या लग्नात अनेक विघ्न येतात. मात्र, शेवटी लग्न एकदाचे पार पडते. यात गुजराती हसमुख पटेल (परेश रावल) आणि पंजाबी गुगी टंडन (ऋषि कपूर) यांची भन्नाट कॉमेडी आहे. याशिवाय विर दास सोबत पायल घोषही धम्माल करणार आहे. हा चित्रपट 15 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात येणार असून त्याचे डायरेक्‍शन संजय छेल यांनी केले आहे.