1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (16:39 IST)

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी नंतर आता मनी लाँड्रिंगमध्ये अडकणार

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणी कमी होण्याऐजवी वाढत चालल्याआहेत. पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकलेल्या राज कुंद्राविरोधात आता ईडीने PMLA केस दाखल केली आहे. ईडीला राज कुंद्राविरोधात मनी लाँडरिंगचे पुरावे सापडले नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पॉर्नोग्राफिक कंटेटच्या विक्रीद्वारे मिळवलेला निधी लंडनमधील एका Llyod बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे. जवळपास दोन महिन्यांपासून राज कुंद्रा कोठडीत आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात राज आणि त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली होती.
 
मुंबईच्या न्यायालयीन कोठडीत असलेला राज कुंद्राविरोधात मुंबई क्राइम ब्रँचने बुधवारी एक चार्जशीट दाखल केली ज्यात 43 लोकांची साक्षही नोंदवण्यात आली आहे. त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि शर्लिन चोप्राचाही समावेश आहे. दरम्यान 1500 पानांची ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.