थोर समाज सुधारकला म्हटले चमचा, त्यावर नेटकरी म्हणाले अभिनेत्रीला तुला मानसोपचाराची गरज
आपल्या वाचाळ वाणीने सध्या अनेक पडीक नट नट्या प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. बदनाम हुवे तो क्या नाम तो हुवा असे सध्या चालले आहे. अशीच एक पडीक अभिनेत्रीने थोर समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्यावर वाईट शब्दात अवहेलना केली आहे.
भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाणारे आणि सतीची प्रथा कायदेशीर बंद करणारे थोर समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांच्याविषयी अभिनेत्री पायल रोहतगी हिने वादग्रस्त विधान केले आहे. रोहतगी हिने ट्विटरवरून हे वादग्रस्त विधान केले असून ट्विटमध्ये तिने राजा राममोहन रॉय यांना ब्रिटीशांचा ‘चमचा’ होते, असे म्हटले आहे.
यानंतर संतापलेल्या नेटक-यांनी तिचा खरपूस समाचार घेतला आहे. इंडियन हिस्टरी पिक्स नावाच्या एका अकाउंटवरून तिने हे ट्विट केले आहे. २२ मे रोजी राजा राममोहन रॉय यांचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. फोटो शेअर करताना त्यात सतिप्रथेचे कट्टर विरोधक आणि समजा सुधारक अशी फोटो ओळ देण्यात आली होती. हे ट्विट पायलने शेअर करताना हे संतापजनक आणि वादग्रस्त टिप्पणी केली आहे.
ट्विट शेअर करताना पायल म्हणाली, सती प्रथा ही हिंदू विधवांना वेश्यावृत्तीसून परावृत्त करण्यासाठी बनवली होती आणि ती अजिबात प्रतिगामी नव्हती. उलट या प्रथेला विरोध करणारे राजा राममोहन रॉय हे ब्रिटीशांचा चमचा होते. ब्रिटीशांनी सती प्रथेचा अवमान करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांचा वापर केल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.पायलच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकांचा भडीमार करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी तुला मानसोपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.